मटार सामोसा
वेळ: २५ ते ३० मिनिटे
४ जणासाठी
साहित्य: मटार २ कप, २ मोठे कांदे बारीक चिरून, १/२ कप ओल खोबरं किसून, ५ ते ६ पाने कडीपत्ता, २ हिरव्या मिरच्या, १/२ इंच आले, ८ पाकळ्या लसूण, धने खिरे पूड १ चमचा, चवीनुसार मीठ, १/२ चमचा साखर, पाणी, मैदा १ वाटी, १ चमचा तांदळाचे पीठ, १/२ चमचा रवा, १ चमचा मोहन, तळन्या पुरते तेल, ओवा १/२ चमचा, चवीनुसार मीठ, १/२ चमचा साखर, पाणी
कृती: सर्व प्रथम १ चमचा तेल गरम झाल्यावर त्यात चिमुटभर मोहरी घालवी, ती तडतडल्यावर, त्यात कडीपत्ता घालावा. आता कांदा चांगला गुलाबी होवेस पर्यंत परतावा. मग त्याच्या मध्ये हिरवी मिर्च, आले आणि लसूण ची एकत्रित पेस्ट परतावी तसेच त्यात धने जिरे पूड, मीठ आणि साखर घालावी आता त्यात मटार आणि ओले खोबरे घालून भाजी मध्यम गास्वर झाकण ठेवून शिजू द्यावी.
१ चमचा गरम मोहन मैद्यात घालून तसेच ओवा, तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ आणि रवा एकत्रित करून चांगले मउसर मळून घेणे व १० मिनेटे त्याच्यावर ओल्या कापडणी झाकून ठेवणे.
भाजी गार झाल्यावर भिजवलेल्या मैद्याचे पुरी एवढ्या आकाराचे गोळे करून पोळी एवढ्या आकारात लाटणे. ह्या पोळीचे २ अथवा ३ भाग करून त्यातील एक भाग घेऊन त्या पट्टीचे एकावर एक येतील असे कोन तयार करून त्यात भाजी भरून पाण्याचा हात लावून ते सील करणे. आता ते गरम तव्यावर २ मिंटने थोडे दाबून उलथ पालथ करणे. आता हे सामोसे तेलातून डीप फ्राय करून सौस, हिरवी चटणी अथवा चिंचेच्या चटणीबरोबर खायला देणे.
टीप: १: मोहन घालताना साधारणता एका वाटीला एक चमचा असे प्रमाण असावे. २. पट्टीचे सामोसे तव्यावर भाजल्यानी त्यतील भाजी बाहेर येत नाही व सामोसे खमंग देखील होतात. ३. पोळी लाटताना ती पातळ असावी कारण आपण एका वर एक असे पट्टीचे पदर ठेवणार आहोत, जर ती जाड लाटल्यास वरचे कव्हर कडक होण्याची शक्यता असते. ४. ह्याच पद्धतीने आपण मिक्स व्हेज सामोसा भाजीमध्ये कोबी आणि गाजर किसून टाकून देखील करू शकतो . ५. जर नुसते मटार उग्र वाटत असतील तर त्यात थोडे भिजलेले पोहे कांदे परतल्यावर टाकू शकतो.









