वेळ: १५ मिनटे
४ जणासाठी
साहित्य: पालक १२ ते १५ पाने, १/२ कप दुध, १/२ कांदा मध्यम आकाराचा
बारीक चिरून, आले लसुन पेस्ट १/२ चमचा चमचा, १ ते २ हिरवी मिरची चिरून, पाव चमचा काळे मिरपूड,१ काडी दालचिनी, १ चमचा कॉर्न फ़्लोउर, पाणी, चवीपुरते मीठ आणि साखर, १ चमचा तेल अथवा बटर
कृती: प्रथम पालकाची पाने धूउन बारीक चिरून २ ते ३ मिनिटे उकळून घ्यावी. नंतर
त्याचे पाणी बाजूला काढून पाने आणि दुध मिक्सर मधून बारीक करून घेणे.
पातेल्यामध्ये तेल अथवा बटर गरम करून त्यात दालचिनी, आले लसुन पेस्ट, मिची आणि कांदा परतून घेणे.
कांदा चांगला परतल्या नंतर त्यात पालकाचे मिश्रण ओतणे. १ कप पाण्यात १ चमचा कॉर्न
फ़्लोउर घालून एकजीव करून ते पालकाच्या मिश्रणात घालावे. आता त्यात चवीपुरते मीठ, साखर, पाव चमचा मिरपूड आणि २ ते २ १/2 कप पाणी घालून उकलणे. वरून
परत थोडेसे चवीपुरते बटर घालणे. सूप थोडेसे गार झाल्यावर मिक्सर मधून परत एकदा
बारीक करून घेणे व पाहिजे तेव्हा गरम करून वाढणे.
टीप: १. दुध वरून न घालता पालका बरोबर घालून मिक्सर मधून काढणे अथवा ते
फाटण्याची शक्यता असते.
२. शेवटी मिक्सर मधून काढून घेणे म्हणजे कांदा, दालचिनी आणि मिरची एकजीव
होऊन चांगली चव लागते.
३. पाण्याचे प्रमाण हे आपल्याला जितके पातळ अथवा घट्ट हवे त्या प्रमाणत
घालावे.

No comments:
Post a Comment