Monday, 11 February 2013

टोमेटो सूप / Tomato soup



टोमेटो सूप

वेळ: २५ मिनिटे ४ जणासाठी


साहित्य: ६ मोठे टोमेटो, २ मध्यम आकाराचे कांदे, १/२ इंच आले, १० ते १२ लसून पाकळ्या, २ चमचे साय, १ चमचा तेल किवा बटर,१/२ चमचा तिखट१/२ चमचा कालीमिरेची पूड, १ चमचा कॉर्न फ़्लोउर, १ कप दुध, २ ते २.१/२ कप पाणीचवीनुसार साखर आणि मीठ, ब्रेड अथवा टोस्टचे तुकडे

कृती: प्रथम टोमेटो , कांदा चार भागांमध्ये चिरून घेणे तसेच आले आणि लसुन बारीक चिरून कुकर मध्ये भिजेल एवढे पाणी घालून ४ शिट्या घेणे. गार झाल्यावर टोमेटो चे साल काढून व पाणी काढून मिक्सर मधून बारीक करून घेणे.पातेल्यात १ चमचा तेल किवा बटर घालून बारीक गसवार तिखट आणि काळीमिर पूड घालून टोमेटो चे मिश्रण घालावे, त्यामध्ये १ कप दुधात १ चमचा कॉर्न फ़्लोउर चे मिश्रण करून घालावे. २ चमचे साय मिक्सर मधून बारीक करून सूप मध्ये घालावी. आता २ कप पाणी, मीठ आणि साखर घालून चांगले उकळू द्यावे. तसेच वरून १ चमच बटर घालावे  आणि लागल्यास वाढताना देखील बटर घालू शकता. ब्रेड क्रूम्प म्हणून टोस्टचे तुकडे टाकता येतील अथवा ब्रेडचे तुकडे वाळवून तेलात तळून घेऊन सूप मध्ये टाकता येतील.

6 comments: