रवा उत्तपा
वेळ: २५ मिनेटे
४ जणासाठी
साहित्य: २ मोठे कांदे बारीक चिरून, २ टोमाटो बारीक चिरून, ३ ते ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, कोथिबिर, मीठ चवीनुसार, १/२ ते ३/४ साखर, ४ ते ५ वाट्या बारीक रवा, तेल, पाणी
कृती: प्रथम कांदा, टोमाटो, कोथिबिर मिरची, मीठ साखर आणि रवा एकत्र करून त्यात बसेल एवढेच पाणी घालून १५ मिनटे भिजत घालावे. नंतर फ्राय प्यान वर तेल घालून ते गरम झाल्यावर वरील मिश्रण गोल आकारात पसरवून घालावे. ग्यास मध्यम आचेवर ठेऊन बाजूनी थोडे तेल सोडावे साधारणता ३ मिनटानी उलथण्यानी हळूंच उलटे करून दुसरी बाजू भाजून घ्यावी. दोन्ही बाजू चांगल्या भाजून झाल्यावर खोबऱ्याच्या हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करावे.
टीप: १. जर टोमाटो वापरायचा नसेल तर हे मिश्रण त्ताकात देखील भिजवता येते. २. हे मिश्रण जास्ती पातळ करू नये थोडे घट्टसर ठेवावे अथवा उतप्पा तुटायची शक्यता असते. ३.जास्ती तिखट हवे असल्यास उतप्पा फ्राय प्यान वर टाकल्या नंतर थोडा कांदा लसूण मसाला भुरभुरता येईल. ४. तसेच आवडी नुसार वरून बटर अथवा चीज स्प्रेड करता येईल. ५. रवा भाजून घेतला तरी चालतो. ६. हा पदार्थ झटपट होणारा असून मुलांना भूक लागल्यावर आवडीनं खाता येतो.
No comments:
Post a Comment