Wednesday, 13 February 2013


व्हेज मनचुरिअन

वेळ: २५ मिनिटे
६ जणासाठी


साहित्य: 
मनचुरिअन बॉलसाठी: प्रत्येकी २ कप गाजर बारीक किसून, कोबी बारीक चिरून अथवा किसून, १ ढोबळी मिरची बारीक चिरून, श्रावणी घेवडा १ कप बारीक चिरून, आले लसुन मिरचीची पेस्ट, पातीचा कांदा २ कप, २ चमचे मैदा, २ चमचे कॉर्न फ़्लोउर, कालेमिरे १/२ चमचा, १ चमचा तांदलाची पिठी,  तेल तलण्यासाठी, मीठ चवीनुसार

मनचुरिअन ग्रेविसाठी: २ चमचे लसूण बारीक चिरून, १ चमचा आले चिरून अथवा किसून, २ हिरव्या मिरच्या, पातीचा कांदा १/२ कप, कोबी १/२ कप, कांद्याची पात १/२ कप, २ चमचे सोयासॉस, २ चमचे टोमाटो सॉस, १ चमचा व्हिनेगर, १ चमचा चिली सॉस, मीठ, साखर, २ चमचे तेल, ४ कप पाणी, १ ते १ १/२  चमचा कॉर्न फ़्लोउर

कृती: सर्व प्रथम सर्व भाज्या एकत्र करून त्याच्या मध्ये आले, लसूण मिरचीची पेस्ट, मीठ, कालेमिरे पूड, मैदा, कॉर्न फ़्लोउर, तांदळाचे पीठ घालून एकजीव करावे. साधारणता ५ ते १० मिनीटानि त्याचे पाण्याचा हात लावून छोटे छोटे बॉल करावे व ते गरम तेलामधून डीप फ्राय करून घ्यावे व ते टिशू पेपर वर ठेवावे. 

एका बाजुला कढईत २ चमचे तेल गरम झाल्यावर त्यात लसूण, आले आणि मिरची परतावी, त्यात पातीचा कांदा लालसर परतून घ्यावा. आता त्यात कोबी घालावा तो थोडा परतून झाला कि ३ १/२ कप पाणी टाकावे. पाणी उकळत आल्यावर १/२ कपा मध्ये १ ते १ १/२  चमचा कॉर्न फ़्लोउर घालून ते मिश्रण वरील कढईत घालून चमच्याने ढवलत राहावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. आता त्यात चिली सौस, टोमाटो सौस, सोया सौस, व्हिनेगर, मीठ आणि साखर घालावी. हे मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्या मध्ये बोल्ल्स सोडावे वरून कांद्याची पात व कोथिबिर घालून गरम गरम सर्व्ह करावे.

टीप: १. बोल्ल्स करताना साधरणता सुपारीच्या आकारा एवढे करावे, खूप मोठे करू नये म्हणजे ते आत पर्यंत तळताना शिजू शकतील. २. बॉल करताना थोडा पाण्याच हात लावावा म्हणजे ते हाताला चिकटणार नाही. ३.शक्यतो बॉल देखील गरमच ग्रेवी मध्ये सोडावे म्हणजे  बोल्ल्सच्या आत पर्यंत ग्रेवी पोहचेल आणि चव चांगली लागेन. ४. ग्रेवी जर पातळ हवी असेल तर त्यातले पाण्याचे प्रमाण वाढवता येईल. ५. समजा बोल्ल्स करताना ते खूप पातळ झाले आहे असे वाटल्यास त्यात थोडा मैदा आणि कॉर्न फ़्लोउर टाकून ते घट्ट करता येईल.

No comments:

Post a Comment