मिसळ :-
वेळ: २० मिनटे
४ जणासाठी
साहित्य: १/४ पाव मटकी, ५ मोठे कांदे, ५ टोमाटो, लाल तिखट १ ते १/२ चमचा, हळद १/४ चमचा, धने पावडर १ चमचा, १/२ चमचा जिरे पावडर, १/२ चमचा जिरे आणि मोहरी, कडीपत्ता, १० ते १२ लसुन पाकळ्या ठेचून, पोहे, तेल २ मोठे चमचे, १ ते १/२ चमचा गरम मसाला (घरचा), फरसाण, कोथिबिर बारीक चिरून, पाणी ६ ते ८ वाट्या, मीठ चवीनुसार, १/२ चमचा साखर, लिंबू
कृती: ३ मोठे कांदे आणि ३ टोमाटो बारीक चिरून घेणे. गेसवार पातेल्यात अथवा कढईत २ चमचे तेल घालावे ते गरम झाले कि त्यात मोहरी तडतडल्यावर जिरे, कडीपत्ता, लसूण घालावे. आता त्यात कांदा चांगला लाल होवेस पर्यंत परतावा. कांदा परतून झाल्यावर ३ बारीक चिरलेले टोमाटो त्यात घालावे व परत एकदा चांगले परतावे. आता त्यात हळद, धना, जीरा पूड, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून तेल सुटोस पर्यंत परतावे. मटकी स्वच्छ निवडून धुवून वरील मिश्रणात घालून चंगली परतावी मग त्याच्यात ६ ते ८ वाट्या पाणी घालून चांगले उकळू द्यावे व त्यातच मटकी शिजू द्यावी. आता शेजारच्या गेसवार कढईत थोडे तेल घालून मोहरी, जिरे, कडीपत्ता, कांदा लाल होवेस पर्यंत परतून घेणे त्यात हळद, साखर आणि मीठ घालावे मग त्यात भिजवलेले पोहे घालून झाकण ठेऊन वाफ घ्यावी. मटकी शिजल्यावर बोउल मध्ये पोहे, फरसाण त्यावर मटकीचा रस्सा बारीक चिरलेला कांदा, टोमाटो, कोथिबिर घालून पाव बरोबर सर्व्ह करावी.
टीप: १. पोहेच्या ऐवजी चिवडा वापरता येईल. तसेच जास्ती तिखट हवे असल्यास घरचा मसाला आणि लाल तिखट अधिक प्रमाणत टाकता येईल.
२ घरचा मसाला नसल्यास ४,५ लवंग, ४, कालेमिरे, २ ते ३ काड्या दालचिनी, ३ ते ४ वेलची, ७ ते ८ लाल मिरच्या, १ चमच जिरे, १ चमचा खसखस, २ ते ३ चमचे धने, असल्यस दगडफूल हे सर्व भाजून मिक्सर मधून काढून घेणे. ३. पाण्याचे प्रमाण देखील आपल्याला पातळ हवे असल्यास मटकीत जास्ती घालावे.

मिसळ ह्या पद्धतीने करणे चालू आहे...
ReplyDeletekhup chan zali hoti, thanks for trying
Delete